Skip to main content

Posts

Showing posts from June, 2019

हवा आहेच....आता वेग हवा!!!

(तसा आता निवडणूकांचा आणि त्यांच्या निकालांचा फडशा प्रत्येकाचा पाडून झालाच असेल.....पण "मोठ्या"-मोठ्यांच्या लेखणीने डरकाळ्या फोडून झाल्या की "पामरांनी" लेखणी हाताशी घ्यावी असा संकेत आहे, त्यास अनुसरुन...) हवा आहेच....आता वेग हवा !!!                    गेल्या निवडणूकांच्यावेळी विजयश्री खेचून आणणार्‍या भाजपच्या दारात यंदा तीच विजयश्री बाकी पक्षांची दारं बंद असल्यामुळे कींवा दार उघडून तिला सामोरे जाणार कोण या गोंधळाच्या व्यग्रतेमुळे स्वतःच गेली खरी, पण नाइलाजास्तव बर्‍याच मोठ्या रुपात...                     एकूणच संसदेत विरोध म्हणजे काय हे कुठल्याच घटक विरोधीपक्षाला शेवटपर्यंत ध्यानातच न आल्याने...विरोधाची राहीलेली हौस एकमेकांचाच विरोध करण्यात यांनी नको त्या वेळी भागवली...त्यामुळेच देशरुपी राजकारणाच्या जलाशयात आपली होडी तरुन जाण्याकरीता सर्व पक्षांनी आपल्या होड्या सरसावल्या असताना, एकमेकांंच्या होडीत त्या बुडवण्यासाठी हेच पक्ष बादली भर-भरुन पाणी ओतत बसल्याने मुळ जलाशयातलेच पाणी आटले ...